नवी दिल्ली: कोरोनाच्या उपचारासाठी तयार केलेल्या कोरोनिल औषधावरून आता पतंजलीनं यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात पतंजलीनं कोरोनावर कोणतंही औषध तयार केलंच नसल्याचा दावा केला. त्यानंतर कोरोना औषध प्रकरणात नैनीताल उच्च न्यायालयात पतंजली आयुर्वेदविरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. असिस्टंट सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाला बुधवारी सुनावणीत स्वत: ला हजर राहण्याचे आणि या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत रामदेव बाबांनी कोरोनिल लॉन्च केलं. मात्र हे औषधं, त्यासाठी आवश्यक परवाना यावरून रामदेव बाबा अडचणीत सापडले. उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं पतंजलीला नोटीस पाठवली. त्यानंतर रामदेव बाबांनी कोलांटउडी घेतली. 'आम्ही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केलाच नव्हता. कोरोना रुग्ण बरे होतील, असं औषध तयार केल्याचं आम्ही म्हटलं होतं,' असं स्पष्टीकरण पतंजलीकडून उत्तराखंड सरकारला देण्यात आलं आहे. २३ जूनला पतंजली आयुर्वेदनं राजस्थानच्या निम्स विद्यापीठासोबत कोरोनाचं औषध तयार केल्याचा दावा केला. या औषधाला कोरोनिल आणि श्वासारी वटी असं नाव देण्यात आलं. आम्ही कधीही कोरोनावरील औषधं तयार केल्याचा दावा केला नव्हता, असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं. आम्ही सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन औषध तयार केलं. त्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. आमच्या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होतात, असा दावा आम्ही केला होता. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं दिलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिलं आहे, असं बाळकृष्ण यांनी सांगितलं.
हेही वाचा
भारताविरोधात पाकनं दोन आघाड्यांवर उघडला मोर्चा; चिनी सैनिक दहशतवाद्यांच्या संपर्कात
TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...
यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार
आजचे राशीभविष्य - 1 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी