EVMच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह;राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:39 PM2018-12-08T12:39:46+5:302018-12-08T12:50:25+5:30

Rajasthan Election : राजस्थानमधील किशनगंज विधानसभा क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर आढळून आल्याचा प्रकार घडला आहे.

ballot unit was found lying on road in Shahabad area of Kishanganj Assembly Constituency in Baran district of Rajasthan | EVMच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह;राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट

EVMच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह;राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट

Next
ठळक मुद्देराजस्थान : रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट, दोन अधिकाऱ्यांचं निलंबनईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

जयपूर - राजस्थानमधील किशनगंज विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, बॅलेट युनिट हाताळण्यात निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सध्या हे बॅलेट युनिट किशनगंजच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी राजस्थानमधील आदर्श नगरमधूनही ईव्हीएमसंदर्भातील व्हिडीओ समोर आला होता. येथे तर एक भाजपाच्या नेत्याच्या घरासमोर ईव्हीएम ठेवण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. 

(राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल)




राजस्थानमध्ये मिळाले होते आणखी एक ईव्हीएम 
राजस्थानमध्ये 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, मतदानानंतर भाजपा नेत्याच्या घरात कथित स्वरुपात ईव्हीएम आढळल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. काही वेळानंतर याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. हा व्हिडीओ आम आदमी पार्टीचे नेते अंकित लाल यांनीही ट्विटरवर शेअर करत भाजपावर हल्लाबोल चढवला.  
 

छत्तीसगडमधून अटक  
दरम्यान, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात स्ट्राँग रुम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली. तर याप्रकरणी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बस्तर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय जगदलपूरमधील धरमपुरा परिसरातील महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी उमापति तिवारी, विजय मरकामसहीत आणखी एका युवकाला अटक केली. 



 

 

Web Title: ballot unit was found lying on road in Shahabad area of Kishanganj Assembly Constituency in Baran district of Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.