राज ठाकरेंचा दावा ठरला खरा, प्रचंड वाढले परप्रांतीयांचे लोंढे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 01:51 PM2017-10-26T13:51:39+5:302017-10-26T13:52:16+5:30

सर्वाधिक स्थलांतर करणारं राज्य म्हणून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमधील गरिबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात गर्दी करत आहेत. तर पुणे आणि सुरत...

between 2001 and 2011 interstate migration in india doubled | राज ठाकरेंचा दावा ठरला खरा, प्रचंड वाढले परप्रांतीयांचे लोंढे

राज ठाकरेंचा दावा ठरला खरा, प्रचंड वाढले परप्रांतीयांचे लोंढे

googlenewsNext

मुंबई - जगातील वेगाने वाढणाऱ्या 100 शहरांमध्ये प्रचंड स्थलांतर होत असून, या यादीत तब्बल 25 शहरं भारतातील आहेत. विशेष म्हणजे या शहरांच्या यादीत, पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाताचा समावेश आहे. 1991-2001 च्या तुलनेत 2001-11 दरम्यान भारतातील स्थलांतराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.  

सर्वाधिक स्थलांतर करणारं राज्य म्हणून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमधील गरिबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात गर्दी करत आहेत. तर पुणे आणि सुरत हे आशिया विभागात सर्वाधिक प्रभावित शहरं म्हणून उदयास आली आहेत. आशियातील प्रभावित शहरांमध्ये पुणे आणि सुरतसह चीनमधील ग्वांगझऊ आणि फिलिपाईन्समधील दवावचा समावेश आहे. बिहारमधील लोंढे मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यात जात आहेत.बेरोजगारी, गरिबी ही त्याची प्रमुख कारणं आहेत. धक्कादायक म्हणजे बिहारचं दरडोई उत्पन्न हे सोमालियासारख्या गरीब देशाएवढं म्हणजेच वार्षिक 33 हजार रुपये इतकं आहे.

दुसरीकडे स्थलांतर न करणाऱ्यांच्या यादीत केरळचा नंबर लागतो.केरळचं दरडोई उत्पन्न हे बिहारच्या चौपट म्हणजेच सुमारे 1 लाख 52 हजारांच्या घरात आहे. त्या तुलनेत जन्मदराचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे केरळमधून बाहेरच्या राज्यात स्थलांतर होण्याचं प्रमाण कमी आहे. बिहारमध्ये जन्मदराचं प्रमाणही प्रचंड आहे, त्यामुळे उत्पन्न आणि त्यावर अवलंबून असलेलं कुटुंब यांतील तफावत खूप आहे. परिणामी येथे स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे. 

Web Title: between 2001 and 2011 interstate migration in india doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.