Bhagwant Mann: 'आप'ने शब्द पाळला... नांदेडहून प्रवाशी नेणाऱ्या ड्रायव्हरच्या कुटुंबीयांस 50 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:23 PM2022-05-09T16:23:40+5:302022-05-09T16:26:22+5:30
पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता
चंडीगड - पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होताच पंजाब सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता, कोविड काळात राज्य परिवहन सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मंजीतसिंग हे पंजाब परिवहन सेवेची बस चालवत होते. 26 एप्रिल 2020 रोजी कोविड कालावधीत त्यांचा मृत्यू झाला होता.
पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. मंजीत सिंग यांच्या निधनानंतर पंजाबमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने 10 लाख रुपये मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस देऊ केले. लॉकडाऊन काळात महाराष्ट्राच्या नांदेडमधील हुजूर साहिब येथे अडकलेल्या तिर्थक्षेत्र प्रवाशांना पंजाबमध्ये परत आणण्यासाठी पंजाब परिवहन सेवेच्या विषेश ड्युटीवर ते कार्यरत होते. यावेळी, कोविड कालावधील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये देण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली होती. त्यावेळी, मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांसही 50 लाख मदत निधीची मागणी आपने केली होती.
ਕੋਰੋਨਾ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਲਿਆਉਣ ਦੀ ਡਿਊਟੀ ਕਰਦਿਆਂ ਜਾਨ ਗੁਆਉਣ ਵਾਲੇ PRTC ਡਰਾਈਵਰ ਮਨਜੀਤ ਸਿੰਘ ਦੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ₹50 ਲੱਖ ਦੀ ਸਹਾਇਤਾ ਬਤੌਰ ਫ੍ਰੰਟਲਾਈਨ ਕੋਰੋਨਾ ਵਾਰੀਅਰ ਦੇਣ ਦੀ ਮੰਗ ਅਸੀਂ ਸਮੇਂ ਦੀ ਸਰਕਾਰ ਤੋਂ ਕੀਤੀ ਸੀ
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 9, 2022
ਉਸ ਮੰਗ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਦੇ ਹੋਏ ਵਿੱਤ ਵਿਭਾਗ ਨੂੰ 50ਲੱਖ ਜਾਰੀ ਕਰਨ ਦੇ ਨਿਰਦੇਸ਼ ਦਿੱਤੇ pic.twitter.com/4rVR1Fveaq
विधानसभा निवडणूकपूर्व वचननाम्यातही आम आदमी पक्षाने मंजीतसिंग यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपये मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, सरकारमध्ये येताच आपने हे आश्वासन पूर्ण केल्यामुळे नागरिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.