25 Sep, 20 05:16 PM
बिहार - गया येथे नवीन कृषी सुधारणा विधेयकाविरोधात विरोधी पक्षांनी नोंदविला निषेध
25 Sep, 20 12:16 PM
सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी विरोधी विधेयकाचा विधेयक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
25 Sep, 20 03:51 PM
Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"
25 Sep, 20 03:16 PM
शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल - प्रियंका गांधी
25 Sep, 20 02:27 PM
नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार - राहुल गांधी
25 Sep, 20 12:56 PM
तामिळनाडूमध्ये नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर इंटरलिंकिंग फार्मर्स असोसिएशनच्या शेतकऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
25 Sep, 20 12:53 PM
भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी नोएडामध्ये रास्ता रोको
25 Sep, 20 12:50 PM
25 Sep, 20 12:43 PM
शेतकरी विरोधी विधेयकाचा कराडमध्ये निषेध
25 Sep, 20 12:16 PM
Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतली बनवले'
25 Sep, 20 11:47 AM
शेतकऱ्यांच्या रॅलीत तेज प्रताप यादव सहभागी
25 Sep, 20 11:15 AM
तेजस्वी यादव ट्रॅक्टरवर स्वार होऊन रॅलीत सहभागी
25 Sep, 20 11:06 AM
सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांना कळसुत्री बाहुली केलं - तेजस्वी यादव
25 Sep, 20 11:01 AM
दिल्लीमध्ये पोलीस बंदोबस्त
25 Sep, 20 10:39 AM
25 Sep, 20 10:28 AM
नाशिक - केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे शेतात केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जमिनीत गाडून आंदोलन केले.
25 Sep, 20 10:19 AM
नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात
25 Sep, 20 10:14 AM
"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा
25 Sep, 20 10:03 AM
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता अकाली दल या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आहे - हरसिमरत कौर
25 Sep, 20 10:00 AM
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर
25 Sep, 20 09:58 AM
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
25 Sep, 20 09:56 AM
केंद्र सरकारच्या या कृतीचा किसान सभेच्यावतीने धिक्कार असून शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने या विधेयकांविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे - डॉ. अजित नवले
25 Sep, 20 09:53 AM
बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करा, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करा - पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
25 Sep, 20 09:49 AM
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.
25 Sep, 20 09:48 AM
अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरू