नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे.
Live Updates:
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात पुकारलेला भारत बंद पूर्णपणे यशस्वी - अशोक गहलोत, काँग्रेस नेते
- ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात
- नागपूर : काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रथयात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध- मनसेचे भायखळा विभागप्रमुख विजय लिपारे, संतोष नलावडे आणि संदिप सूर्यवंशी यांना अटक- यवतमाळ : शहर व जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद; बहुतांश दुकाने बंद; खासगी वाहतूक विस्कळीत- ठाणे - बैलगाडी रस्त्यात आणून काँग्रेसचं आंदोलन, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत- लालबागमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बेस्ट बसेसची तोडफोड
- अंधेरीत डीएन नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली- डोंबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियनकडून रिक्षा बंद- जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद- कांदिवली चारकोपमध्ये अद्याप स्थिती सामान्य, बंदचा परिणाम नाही- कल्याणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी; पश्चिमेकडील शिवाजी चौकात आंदोलन; मनसेचाही सहभाग- अशोक चव्हाणांसह काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. 3 वर आंदोलन सुरू, काँग्रेस नेत्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी- जळगावातील जामनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर; बंदला व्यापाऱ्यांचाही पाठिंबा- भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पेट्रोल पंपावर कडेकोट पोलीस बंदोबस्त- राजघाटावरुन राहुल गांधींचा मोर्चा सुरू; राहुल गांधींचं रामलीला मैदानाकडे मार्गक्रमण- सोलापूरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, पंढरपुरातील दुकाने बंद- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजघाटावर पोहोचले- विरारमध्ये खासगी शाळांना सुट्टी जाहीर- मुंबई आणि ठाण्यात रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत, बहुतांश शाळादेखील सुरू- पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी पीएमटी बस फोडली- नाशिक शहरातील बस सेवा आज बंद राहणार- आंदोलनापूर्वीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात- ओदिशात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक्स्प्रेस गाड्या रोखल्या- आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन- नाशिकमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाला सुरुवात