Bhawanipur bypoll : ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 08:58 AM2021-09-30T08:58:22+5:302021-09-30T09:01:31+5:30
याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत.
भवानीपूर -पश्चिम बंगालमधील भवानीपूर जागेसाठी मतदान सुरू झाले आहे. या हाय प्रोफाईल सीटवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) आणि भाजपच्या प्रियंका टिबरेवाल (priyanka tibrewal) यांच्यात काट्याची टक्कर आहे. तर सीपीआय (एम)कडून श्रीजिब विश्वास मैदानात आहेत. मतदान असलेल्या भागांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत. मात्र, यातच TMC बूथ कॅप्चर करण्याच्या इराद्यात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. (Bhawanipur bypoll: Mamta, Priyanka face to face, BJP alleges TMC intention to capture booth)
बूथ कॅप्चर करण्याचा टीएमसीचा इरादा -
भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी म्हटले आहे, की टीएमसीचे आमदार मदन मित्रा यांनी जाणूनबुजून वार्ड क्रमांक 72 मध्ये व्होटिंग मशीन बंद बंद केले आहे. कारण बुथवर कब्जा करण्याचा त्यांचा इरादा आहे.
Madan Mitra (TMC MLA) has purposely shut the voting machine here as he wants to capture the booth: Priyanka Tibrewal, BJP candidate for Bhabanipur by-poll at polling booth of ward number 72 pic.twitter.com/lFB5hQytTY
— ANI (@ANI) September 30, 2021
बूथची सुरक्षितता पोलिसांकडे -
बंगालमधील तीनही जागांवर ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठीही स्वतंत्रपणे स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले आहे. तसेच बुथची सुरक्षितता पोलिसांच्या हाती देण्यात आली आहे. याशिवाय, मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर 13 QRT टीम, 22 सेक्टर मोबाइल, 9 HRFS, सर्विलांस टीम, फ्लाइंग स्क्वॅडसह वेगवेगळ्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
#WestBengalBypolls | Polling begins in Bhabanipur, polling is scheduled to end at 6:30 pm, according to State CEO
— ANI (@ANI) September 30, 2021
(Visuals from Mitra Institution polling booth) pic.twitter.com/fgW9fvMsbb