सिद्धनाथ सिंह हे बिहारमधील भोजपूरचे शेतकरी आहेत. त्यांच्या मुलाने लहान वयातच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव मोठं केलं. भोजपूरच्या बखोरापूर गावात राहणाऱ्या सत्यमने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आयआयटीमध्ये प्रवेश केला होता. सर्वात कमी वयात हे करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. याशिवाय अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी आणि Apple यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
सत्यम कुमारची यशोगाथा वयाच्या 12 व्या वर्षी सुरू झाली. तो लहानपणापासूनच खूप हुशार होता. त्याला अनेकवेळा शाळा बदलाव्या लागल्या. गावातील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सत्यमला काही काळासाठी कोटा येथे पाठवण्यात आले. याचा परिणाम असा झाला की वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सत्यमने आयआयटी प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्याने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक केलं आहे. त्यानंतर तो अमेरिकेतील टेक्सास यूनिव्हर्सिटी ब्रेन कॉम्प्युटरवर पीएचडी करण्यासाठी गेला.
स्कॉलरशिप मिळाली
सत्यमचा अमेरिकेत पोहोचेपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेकवेळा परिस्थिती अशी बनली की, शेतकरी वडिलांना घर, शेतजमीन सर्व काही गहाण ठेवावं लागलं, पण या सगळ्यातही त्याच्या कर्तृत्वामुळे सत्यमला स्कॉलरशिप मिळाली. सध्या तो अमेरिकेत पीएचडीचे शिक्षण पूर्ण करत आहेत
Apple मध्ये केली इंटर्नशिप
आयआयटी कानपूरमधून बी टेक आणि एम टेक केल्यानंतर सत्यमला Apple, गुगल आणि फेसबुक या जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्यासाठी सत्यमने Appleकंपनीची निवड केली. स्वित्झर्लंडमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली. सध्या संपूर्ण गाव सत्यमच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.