अवसायकांना प्रतीक्षा कागदपत्रांची बीएचआर पतसंस्था: १६ नोव्हेंबरपासून कामकाज

By admin | Published: November 14, 2015 12:07 AM2015-11-14T00:07:52+5:302015-11-14T00:07:52+5:30

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कामकाजाचा ताबा अवसायक जितेंद्र कंडारे यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष मुळ कागदपत्र अद्याप ताब्यात नसल्याने बर्‍याच बाबींचा उलगडा होणे बाकी आहे.१६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला जाईल अशी माहिती कंडारे यांनी दिली.

BHR status of waiting documents for the casualty: Work from 16th November | अवसायकांना प्रतीक्षा कागदपत्रांची बीएचआर पतसंस्था: १६ नोव्हेंबरपासून कामकाज

अवसायकांना प्रतीक्षा कागदपत्रांची बीएचआर पतसंस्था: १६ नोव्हेंबरपासून कामकाज

Next
गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कामकाजाचा ताबा अवसायक जितेंद्र कंडारे यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष मुळ कागदपत्र अद्याप ताब्यात नसल्याने बर्‍याच बाबींचा उलगडा होणे बाकी आहे.१६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला जाईल अशी माहिती कंडारे यांनी दिली.
कंडारे यांनी दोन दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या एमआयडीसीतील प्रमुख कार्यालयास भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांची भेट घेतली. कामकाजात सहकार्य मिळावे म्हणून बैठक घेत त्यांना समजही कंडारे यांनी दिली होती.

जिल्‘ातील विविध पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी बीएचआर पतसंस्थेची विविध कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पोलिसांकडून या कागदपत्रांची छाननी सुरू असली तरी अवसायक म्हणून ही कागदपत्रे अहवालासाठी आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन ती लवकरात लवकर मिळावीत असे अवसायकांचे प्रयत्न सुरू झाले आहे.

१६ पासून कामकाज
दिवाळीच्या सु˜ीमुळे बीएचआर पतसंस्थेचे कामकाज बंद होते. १६ नोव्हेंबरपर्यंत सुटी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली जाईल, असे कंडारे यांनी सांगितले.

Web Title: BHR status of waiting documents for the casualty: Work from 16th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.