तामिळनाडूतील विरोधी पक्षांना मोठा धक्का, अनेक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश, पाहा नावांची यादी....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:37 PM2024-02-07T14:37:41+5:302024-02-07T14:39:07+5:30
सर्वच राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. तामिळनाडूतील विरोधी पक्षांचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तामिळनाडूच्या राजकारणातला मोठा चेहरा नसला तरी, आता भाजपा नेत्यांमध्ये स्वीकारार्ह पक्ष बनत असल्याचा मेसेज या प्रवेशातून स्पष्ट होत आहे. तामिळनाडू भाजपामध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची यादी तुम्ही खाली पाहू शकता...
भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी...
1. श्री के. वडिवेल - करूर
2. श्री पी.एस. कंदसामी - अरवाकुरीची
3. श्रीमती गोमथी श्रीनिवासन (माजी मंत्री) – वलंगाईमन
4. श्री आर. चिन्नास्वामी - सिंघनल्लूर
5. श्री आर. दुराईसामी (ए) चॅलेंजर दुराई - कोईम्बतूर
6. श्री एम.व्ही.रत्नम – पोलाची
7. श्री एस.एम.वासन – वेदचांदूर
8. श्री एस. मुथुकृष्णन - कन्याकुमारी
9. श्री पी.एस. अरुळ - भुवनगिरी
10. श्री एन.आर. राजेंद्रन
11. श्री आर. थंगारसू - एंटीमॅडम
12. श्री गुरुनाथन
13. श्री व्ही.आर. जयरामन - थेनी
14. श्री बालसुब्रमण्यम - सिरकाझी
15. श्री चंद्रशेखर - चोलवंतन
सर्वच राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे भाजपाचे निवडणूक कार्यालय उघडण्यात आले. यावेळी तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका ऐतिहासिक असतील, असे म्हटले होते. ते म्हणाले की, 2024 मध्ये मोदींच्या समर्थनार्थ हे मतदान होईल. तामिळनाडूतील लोकांची पक्षावर निष्ठा आहे. तसेच, विविध पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली. ही निवडणूक पक्षीय निवडणूक नसून मोठी निवडणूक आहे, असे मत सुद्धा के. अन्नामलाई यांनी व्यक्त केले.