Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

By सायली शिर्के | Published: September 25, 2020 10:47 AM2020-09-25T10:47:42+5:302020-09-25T10:50:28+5:30

Bihar Election 2020 : निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

bihar assembly elections 2020 election commission of india to hold press conference today | Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने याआधी फेटाळली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल याचा पुनरुच्चार केला आणि निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता आज  बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. 

निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत पाच टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. मात्र यावेळी कोरोनाचं संकट आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केलेली आहे. 

बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह इतर राजकीय पक्षांनी विधानसभेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. निवडणूक याच वेळी घेऊन लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, असे लोकजनशक्ती पक्षाने आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात 

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची प्रतिमा संयमी नेता अशी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा तेथे मोठा पक्ष आहे. अशा वेळी 243 जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजपाकडे घेताना फडणवीस तसेच बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा कस लागणार आहे. यानिमित्ताने फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस यांच्या निकटस्थांनी सांगितले की, ही जबाबदारी केवळ बिहार निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात तूर्त अजिबात जाणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Bandh Live Updates : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, आज 'भारत बंद'ची हाक

"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा

दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता

याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी

बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

Read in English

Web Title: bihar assembly elections 2020 election commission of india to hold press conference today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.