पाटणा - बिहारची (Bihar) राजधानी पाटण्याला लागून असलेल्या दानापूरमधील जमसौत मुसहरी गावातील एका मुलीला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (Microsoft CEO) अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी दत्तक घेतले होते. खरेतर दहा वर्षांपूर्वी बिलगेट्स दांपत्य या गावात आले होते. तेव्हा त्यांनी 11 वर्षांच्या राणी कुमारीला मांडीवर घेऊन ‘मुलीसारखी’ असल्याचे म्हटले होते. तेव्हा राणी एक वर्षांची होती. (Billionaire Bill Gates daughter in bihar not able to afford education)
रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे. तसेच या गावातील अधिकांश लोक निरक्षर आहेत. गेट्स यांनी त्यावेळी गावाच्या विकासावरही भाष्य केले होते. मात्र, येथून निघून गेल्यानंतर गेट्स अथवा त्यांच्या संस्थेचे लोक या ठिकाणी अद्यापही फिरकलेले नाहीत.
बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली २,४२,००० एकर शेतजमीन
विचारल्यानंतर राणी केवळ हसते आणि काहीही बोलूशकत नाही. नव्या पिढीसाठी येथे केवळ एक सरकारी प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. गावातील लोक सांगतात, की 23 मार्च 2011 रोजी बिल गेट्स आपल्या पत्नीसह या गावात आले होते आणि त्यांनी राणी कुमारीला मुलगी मानले होते. एढेच नाही, तर त्यांनी तिला आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाणे खेळवलेदेखील. यावेळी त्यांनी आमच्या गावाच्या विकासावरही भाष्य केले होते. मात्र, येथून निघून गेल्यानंतर अजूनही, ना बिल गेट्स येथे आले, ना त्याच्या संस्थेचे लोक येथे आले. आज राणी आणि तिचे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत आहे, असे येथील लोक सांगतात.
रानीला घेतले होते दत्तक -राणी शाळेत जाऊ शकत नाही, मात्र, मिलिंडा गेट्स फाउंडेशनने नंतर दुर्लक्ष केले. दानापूरमधील जामसौत येथे राहणारी राणी कुमारी साधारणपणे 11 वर्षांची आहे. जेव्हा गेट्स दांपत्याने राणीला दत्तक घेतले होते आणि आपल्या मुलीसारखी म्हणून तिच्यावर प्रेम केले होते, तो दिवस आजही राणीची आई कुंती देवी यांना आठवतो. कुंती देवी सांगतात, की अमेरिकेहून लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्या मुलीला दत्तक घेतले. ते नेमके काय बोलत होते, हे आम्हाला समजले नाही. मात्र, त्यानंतर ते आजवरही येथे आले नाही.
बिल गेट्स फाउंडेशन आणि बिहार सरकार यांच्यात 2010 मध्ये आरोग्य सुधारणेसंदर्भात एक करार झाला होता. या करारांतर्गत, बिल गेट्स दांपत्य दानापूरच्या जमसौत येथे पोहोचले आणि राणी कुमारीला मुलगी माणून तिच्यावर भरपूर प्रेम केले होते.