बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 01:33 PM2017-08-21T13:33:28+5:302017-08-21T13:34:43+5:30

बिहारमधील काँग्रेसच्या दबंग खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं आज 3 जणांना उडवलं आहे.

Bihar: Congress MP Ranjeet Ranjan's Convoy Crushes Three People To Death | बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

Next

बिहार, दि. 21 - बिहारमधील काँग्रेसच्या दबंग खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं आज 3 जणांना उडवलं आहे. सुपोलमधील निर्मली-सिकर्ता या रस्त्यावर हा अपघात झाला आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे. निर्मली शहराध्यक्ष रामप्रकाश यादवही उपस्थित होते. जखमींना निर्मलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रणजित रंजन हे जन अधिकारी पक्षाचे नेते पप्पू यादव यांच्या पत्नी आहेत. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या होत्या, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांचीही काही काळ धावपळच उडाली होती. संसदेत बाईक घेऊन यायची परवानगी नसताना, निळ्या रंगाचा सूट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या 42 वर्षीय रणजित रंजन बाईकवरून आल्या होत्या, तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखलेच नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्याने त्या बाईक थेट आवाराच्या आत घेऊन गेल्या होत्या.
आपण बाईकच काय, अनेकदा सायकलही चालवतो, असे रणजित रंजन यांनी पत्रकारांना सांगितले होते. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, हे त्यांनी आवर्जून सांगितले होते. खा. रंजन या दोन मुलांची आई आहेत. बिहारमधला वादग्रस्त नेता पप्पू यादवच्या त्या पत्नी आहेत. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी जम्मू व काश्मीरमध्ये भारताचा झेंडा जाळण्यात गैर ते काय असा प्रश्न विचारून नवा वाद निर्माण केला होता. यादव यांच्या या टिप्पणीवर भाजपाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या पप्पू यादव यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून स्वत:चा पक्ष, राष्ट्रीय जनता दलात प्रवेश, भाजपाशी जवळीक, पत्नी काँग्रेसची खासदार असा सर्वपक्षीय संचार असलेले ते नेते आहेत. सगळे हिंदू संत राष्ट्रविरोधी असल्याचे विधानही त्यांनी याच भरात केले असून अशा संतांपासून पिळवणूक होऊ द्यायची नसेल तर मंदिरांमध्ये जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला होता.

Web Title: Bihar: Congress MP Ranjeet Ranjan's Convoy Crushes Three People To Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.