आयफोन ते कार...प्रेयसीला 20 लाखांचे गिफ्ट दिले; आता तिने नंबर ब्लॉक केला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 03:47 PM2024-03-10T15:47:12+5:302024-03-10T15:47:45+5:30

आता तरुणाने पोलिसांना मध्यस्थीचे आवाहन केले आहे.

Bihar Muzaffarpur News:: iPhone to car...boyfriend gifted items of 20 lakhs to girlfriend; Now she blocked his number | आयफोन ते कार...प्रेयसीला 20 लाखांचे गिफ्ट दिले; आता तिने नंबर ब्लॉक केला

आयफोन ते कार...प्रेयसीला 20 लाखांचे गिफ्ट दिले; आता तिने नंबर ब्लॉक केला

Muzaffarpur News: प्रेमामध्ये पडलेले जोडपे आपल्या साथीदारासाठी कीहीही करायला तयार होतात. खासकरुन प्रियकर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देतो. पण, महागड्या भेटवस्तू देणे मुझफ्फरपूरमधील एका तरुणाला चांगलेच भोवले. मुझफ्फरपूरमधील एका तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपबीती सांगितली. त्याने आपल्या प्रेयसीला आयफोन, कारसह 20 लाख रुपयांच्या अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. आता हे सर्व घेतल्यानंतर तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आहे.

प्रियकराने पोलिसांकडे मदत मागितली
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण जिल्ह्यातील मुशहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्याची प्रेयसी शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसबंध होते. त्याने प्रेयसीला लाखो रुपयांच्या विविध भेटवस्तू दिल्या. विशेष म्हणजे, तो आजही चक्क कर्ज काढून दिलेल्या भेटवस्तूंचा ईएमआय भरत आहे. लाखो रुपयांचे गिफ्ट भेटल्यानंतर आता त्याच्या गर्लफ्रेंडने अचानक त्याचा नंबर ब्लॉक केला आहे. 

ती फोन उचलत नाहीये
अस्वस्थ झालेल्या प्रियकराने पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. प्रियकराने पोलिसांना सांगितले की, तो सध्या जिल्ह्यातील एका बीएड कॉलेजमध्ये अकाउंट्स विभागात काम करतो, तर त्याची गर्लफ्रेंड राज्याच्या आरोग्य विभागात, पाटणामध्ये कंत्राटी काम करते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तिने याचा फोन ब्लॉक केला आहे. आता याप्रकरणी त्याने पोलिसांकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Bihar Muzaffarpur News:: iPhone to car...boyfriend gifted items of 20 lakhs to girlfriend; Now she blocked his number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.