विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 01:08 PM2022-06-19T13:08:36+5:302022-06-19T13:09:55+5:30
पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे.
पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात आग लागल्याने ही लँडिंग करण्यात आली. दिल्लीला जाणारे हे विमान पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर उतरवण्यात आले. या विमानात 185 प्रवासी होते, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने पाटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी 12.10 वाजता उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या पंख्याला आग लागली. आश्चर्यकारक बाब म्हणजे या विमानाच्या पंख्याला आग लागल्याचे लोकांनी खालून पाहिले.
#WATCH Delhi bound SpiceJet flight returns to Patna airport after reporting technical glitch which prompted fire in the aircraft; All passengers safely rescued pic.twitter.com/Vvsvq5yeVJ
— ANI (@ANI) June 19, 2022
खालून लोकांनी आग पाहिली
विमानाच्या पंख्यातून ज्वाळा निघताना लोकांनी पाहिले. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पाटणा पोलिसांना दिली. यानंतर या घटनेची माहिती विमानतळावर देण्यात आली. त्यानंतर हे विमान परत आणण्यात आले. हे विमान बिहटा एअरफोर्सवर उतरवण्याचे आधी ठरले होते, पण नंतर हे विमान पटनाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले.
Bihar | The Delhi-bound flight had returned to Patna airport after locals noticed a fire in the aircraft & informed district & airport officials. All 185 passengers safely deboarded. Reason is technical glitch, engineering team analysing further...: Patna DM Chandrashekhar Singh pic.twitter.com/KLK5wgZA0h— ANI (@ANI) June 19, 2022
चौकशी सुरू
दरम्यान, पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, 'विमानाच्या पंख्याला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी जिल्हा आणि विमानतळ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर तात्काळ दिल्लीला जाणारे हे विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व 185 प्रवासी सुखरूप आहेत. या तांत्रिक बिघाडामागचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.'