लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी जाहीर केले. २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांची मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. नितिश कुमार यांची जदयु आणि भाजपा यांची रालोआ विरुद्ध राजद-काँग्रेस यांचे महागठबंधन अशी रंगतदार लढत यंदा पाहायला मिळणार आहे.
असे असतील तीन टप्पेटप्पे तारीख जिल्हे जागा केंद्रेपहिला २८ आॅक्टोबर १६ ७१ ३२ हजारदुसरा ३ नोव्हेंबर १७ ९४ ४२ हजारतिसरा ७ नोव्हेंबर १५ ७८ ३३ हजारप्रचार करण्याचे आगळे नियमच्फक्त पाच लोकांनीच एकत्र जाऊन घरोघरी प्रचारास परवानगीच्रोड शोमध्ये जास्तीतजास्त पाच कारचा ताफा सहभागी होऊ शकेलच्उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार व त्याच्या सोबत एक व्यक्तीकोरोना रुग्णांसाठी मतदानाची खास सोयकोरोना रुग्ण आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रात मतदान करू शकतील. त्यांना व ८० वर्षांपुढील वृद्धांना टपालाद्वारे मतदानाची सुविधा दिलेली आहे.