नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:51 PM2021-04-04T13:51:09+5:302021-04-04T13:53:50+5:30

२००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. 

bijapur naxal attack more soldier bodies recovered missing many dead injured | नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे२००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. यापूर्वी जवान बेपत्ता असल्याचं आलं होतं सांगण्यात.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवानांना हौतात्म्य आलं आहे. दरम्यान,  यापूर्वी छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजी डी.एम. अवस्थी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ जवानांचं पार्थिव आतापर्यंत सापडल्याचं सांगण्यात येत आहे. 

सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरूवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरनं २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. 



केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते, असं राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक ओ.पी. पाल यांनी शुक्रवारी रात्री सांगितलं होतं. दरम्यान, शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमत तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं. यापूर्वी २३ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यात स्फोट करून बस उडवली होती. यात बसमध्ये असलेले डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते. 

Web Title: bijapur naxal attack more soldier bodies recovered missing many dead injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.