'कार-बाईक चालवणारे भुकेने मरत नाही आहेत, पेट्रोलसाठी जास्त पैसे द्यावेच लागतील', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 04:05 PM2017-09-16T16:05:30+5:302017-09-16T16:12:19+5:30

पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल. केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे असंही के जे अल्फोन्स बोलले आहेत. 

'Bikes are not dead due to hunger, they will have to pay more for petrol', BJP minister's controversial statement | 'कार-बाईक चालवणारे भुकेने मरत नाही आहेत, पेट्रोलसाठी जास्त पैसे द्यावेच लागतील', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य 

'कार-बाईक चालवणारे भुकेने मरत नाही आहेत, पेट्रोलसाठी जास्त पैसे द्यावेच लागतील', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य 

Next
ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरिब लोक नाहीत किंवा ते भुखेने मरतही नाही आहेत असं वक्तव्य के जे अल्फोन्स यांनी केलं आहे'पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल'केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे असंही के जे अल्फोन्स बोलले आहेत. 

नवी दिल्ली, दि. 16 -  केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरिब लोक नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाही आहेत असं वक्तव्य के जे अल्फोन्स यांनी केलं आहे. के जे अल्फोन्स बोलले आहेत की, पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल. केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे असंही के जे अल्फोन्स बोलले आहेत. 

'सरकार गरिबांचं कल्याण करण्याच्या हेतूने काम करत आहे. प्रत्येक गावात वीज देण्यासाठी, लोकांसाठी घरनिर्माण करण्यासाठी, शौचालय बांधून देण्यासाठी सरकार आलं आहे', असं के जे अल्फोन्स यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'गरिबांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे, त्यासाठीच आम्ही कर चुकवण्यासाठी सक्षम असणा-यांवर कर लावत आहोत'. 

'तुम्ही सांगा पेट्रोल कोण खरेदी करतं ? तेच लोक ज्यांच्याकडे कार आहे, बाईक आहे. निश्चितपणे हे लोक भुकेने मरत नाहीत आहेत. ज्यांना कर चुकवणे शक्य आहे त्यांनी कर चुकवलाच पाहिजे', असं के जे अल्फोन्स बोलले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गेल्या ३ वर्षांत ५0 टक्क्यांनी कमी झाले असताना, भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या किमतींनी मंगळवारी उच्चांक गाठला. दिल्लीमध्ये पेट्रोल 70 रुपये 38 पैसे तर डिझेल 58 रुपये 72 पैशांच्या दराने विकलं जात होतं. तर मुंबईत पेट्रोलचा दर 79 रुपये 48 पैसे आणि डिझेलचा दर 62 रुपये 37 पैसे होता. चेन्नई व कोलकत्यातही भाव असेच चढे आहेत. या दरवाढीवर सर्वत्र टीका सुरू होताच, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी लगेच संबंधितांची बैठक बोलावली, पण त्यातून दरवाढ कमी करण्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्या आयात कच्च्या तेलाचे रिफाइंड इंधनात रूपांतर करतात. त्यांना ते २१.५0 रुपये दराने मिळते. कच्च्या तेलावरील रिफायनरीचा खर्च, एन्ट्री टॅक्स, लॅडिंग खर्च व प्रक्रियेतले अन्य खर्च यांची बेरीज साधारणत: ९.३४ रुपये प्रतिलीटर आहे. याचा अर्थ पेट्रोल उत्पादनाचा खर्च ३१ रुपये आहे.

ग्राहकांना मात्र, पेट्रोलसाठी ८0 रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने २0१४ पासून ३ वर्षांत पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी १२६ टक्क्यांनी, तर डिझेलवरील ड्युटी ३७४ टक्क्यांनी वाढविली. राज्यांनी कर वाढविले. त्यामुळे केवळ करापोटीच ४९ रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या दरांसाठी डायनॅमिक फ्युएल प्राइस फॉर्म्युला १६ जून २0१७ रोजी लागू झाला, तेव्हा दिल्लीत पेट्रोलचा दर ६५.४८ रुपये, तर डिझेलचा ५४.४९ रुपये होता.

इंधनाच्या दरांचे रोज मूल्यांकनाचा डायनॅमिक फ्युएल प्राइस फॉर्म्युला सुरू करताना, धर्मेंद्र प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भावानुसार ग्राहकांना थेट लाभ मिळेल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात हा निर्णय लागू झाल्यानंतर, पेट्रोल व डिझेलच्या दरात सतत वाढच होत गेली.

Web Title: 'Bikes are not dead due to hunger, they will have to pay more for petrol', BJP minister's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.