नवी दिल्ली - ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी 14 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बुधवारी भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचे मंथन करण्यासाठी भाजपाने शुक्रवारी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी स्वत: हजर असणार आहे. लोकसभेतील पराभवावर चर्चा केली जाणार आहे. पराभव का झाला यावर चर्चा होणार आहे.
नवी दिल्ली येथे शुक्रवारी दीनदयाल उपाध्याय रोडवर नव्या कार्यालयामध्ये ही बैठक बोलवली आहे. या बौठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहे. यावेळी पंतप्रधान नेत्यांना काही सुचना करण्याची शक्यता आहे. यामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करा आणि सरकारी योजना सर्वसामन्य लोकांपर्यत कशा पोहचतील याची माहिती लोकांना द्या अशा सुचना नेत्यांना दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.
आधिकवेशन सुरु असताना प्रत्येक मंगळवारी पार्टीची बैठक संसदेत होते. पण ही बैठक भाजपासाठी महत्वाची मानली जात आहे. कारण 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची रणरनीतीही यावेळी ठरवली जाण्याची शक्यता आहे. 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाची दिशा काय असणार याबैठकीनंतर ठरणार आहे. या बैठकीत पक्षअध्यक्ष अमित शाहही उपस्थित राहणार आहे.
पराभवाची आम्ही समीक्षा करू - योगी
हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र आम्ही जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करतो. या पराभवाची आम्ही समीक्षा करू, विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. सपा आणि बसपामधील राजकीय सौदेबाजी देशाच्या विकासाला बाधित करणारी आम्ही त्याविरोधात रणनीती आखू, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.