चार राज्यांत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:09 AM2020-06-04T05:09:52+5:302020-06-04T05:10:05+5:30

राज्यसभेच्या २४ जागांसाठी १९ जूनला निवडणूक : विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी डावपेच

BJP decides to win more seats in four states | चार राज्यांत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

चार राज्यांत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

Next

हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशावर कोरोना, चक्रीवादळाचे संकट कोसळलेले असतानाच राज्यसभेच्या २४ जागांसाठी १९ जूनला होणाऱ्या निवडणुकांचे पडघमही वाजू लागले आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या चार राज्यांत पूर्वीपेक्षा राज्यसभेच्या चार जास्त जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असून त्या दृष्टीेने पक्षाकडून डावपेच आखले जात आहेत.
भाजपने गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. हीच खेळी भाजप कर्नाटकमध्येही केली आहे. कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांच्या निवडणुकांसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. कर्नाटक विधानसभेतील भाजपची ताकद बघता हा पक्ष राज्यसभेच्या दोन जागा सहजी जिंकू शकेल. मात्र त्यावर समाधान न मानता आणखी एका जागेवर विजय मिळविण्याचे लक्ष्य भाजपने राखले आहे. जनता दल (सेक्युलर) व काँग्रेस आघाडीमध्ये झालेल्या मतभेदांचा फायदा उठवत कर्नाटकमध्ये भाजपने डावपेचांद्वारे सत्ता हस्तगत केली होती.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे व त्यांचे समर्थक असलेल्या २२ आमदारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर हे सर्वजण भाजपच्या वळचणीला गेले. त्यामुळे या राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले. मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाºया निवडणुकांत भाजपतर्फे ज्योतिरादित्य शिंदे व सुमेर सिंह हे रिंगणात आहेत. तर काँग्रेसने दिग्विजयसिंह व फुलसिंग बरैया यांना उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशातील आपल्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता भाजप राज्यसभेच्या दोन्ही जागांवर सहजी विजय मिळवेल अशी चर्चा आहे.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाºया निवडणुकांत भाजपतर्फे रामिलाबेन बारा व अभय भारद्वाज तर काँग्रेसतर्फे शक्तिसिंह गोहिल व भरतसिंह सोळंकी हे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र भाजपने गुजरातमध्ये नरहरी अमीन हे तिसरे उमेदवारही उभे केले आहे. गुजरातमध्ये विधानसभेत भाजपचे १०३ आमदार असून काँग्रेसचे ६८, भारतीय ट्रायबल पार्टीचे (बीटीपी) २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, एक अपक्ष आमदार असे संख्याबळ आहे. राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला ३५.०१ टक्के मते मिळविण्याची आवश्यकता आहे. मात्र बीटीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष नेमके कोणाला मतदान करतील याबद्दल अंदाज लावणे कठीण आहे.
गुजरात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत मतभेदांनी पोखरलेली असून शंकरसिंह वाघेला यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले होते.

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या मार्गात अडथळे
राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपने राजेंद्र गेहलोत व ओ. एस. लाखावत तर काँग्रेसने के. सी. वेणुगोपाल व नीरज डांगी हे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेसचे विधानसभेत १०७ तर भाजपचे ७२ आमदार आहेत. मात्र अपक्ष, इतर पक्षांचे २२ आमदार काँग्रेसला सहजासहजी विजय मिळवून देण्याची शक्यता दिसत नाही. राज्यसभेत ३७ खासदार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र या सभागृहाच्या १८ जागांसाठी मार्चमध्ये होणारी निवडणूक कोरोना साथीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता या निवडणुकांबरोबरच कर्नाटक (४), अरुणाचल प्रदेश (१), मिझोराम (१) येथील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Web Title: BJP decides to win more seats in four states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा