५ राज्यांच्या निवडणुका; भाजपने कसली कंबर; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरला अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:02 AM2021-10-19T06:02:25+5:302021-10-19T06:03:14+5:30

कामाला लागण्याच्या दिल्या सूचना

bjp gears up for 5 state assembly elections | ५ राज्यांच्या निवडणुका; भाजपने कसली कंबर; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरला अजेंडा

५ राज्यांच्या निवडणुका; भाजपने कसली कंबर; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरला अजेंडा

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : पुढील वर्षी हाेणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात निवडणुकींचा अजेंडा ठरविण्यात आला. निवडणुकीचे मुद्दे आणि रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने राज्यांचे प्रभारी व कार्यकारिणी सदस्यांसाेबत चर्चा झाली. 

नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते. पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गाेवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका हाेणार आहेत. त्यासंबंधी राजकीय डावपेच आणि धाेरणांबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याशिवाय पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करून पुढील काम महिन्यासाठी पक्षाचा अजेंडा मांडण्यात आला. काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. काेराेना महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेली चांगली कामे जनतेसमाेर नेण्याच्या सूचनाही नड्डा यांनी बैठकीमध्ये केल्या. माेदी सरकारने गरिबांना माेफत धान्य देण्याशिवाय लसीकरण व अनेक कल्याणकारी याेजनांवर केलेल्या कामाचा दाखलाही नड्डा यांनी बैठकीदरम्यान दिला. 

पक्षाचे उपाध्यक्ष रमण सिंह, सरचिटणीस बी. एल. संताेश, उत्तर प्रदेशचे प्रभारी आणि उपाध्यक्ष राधामाेहन सिंह, उत्तराखंड आणि पंजाबचे प्रभारी दुश्यंत गाैतम, गाेव्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सरचिटणीस विनाेद तावडे यांच्यासह उपाध्यक्ष, सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते उपस्थित हाेते. 

पक्ष मजबुतीवर चर्चा -पंकजा मुंडे
बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. याशिवाय पक्ष मजबूत करण्याबाबतही चर्चा झाली. ही बैठक पक्षाच्या रचनेचा भाग असल्याचे कार्यकारिणी सदस्य पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

राज्यांचा वेगाने विकास करणार 
भाजपचे लक्ष्य डबल इंजिन असलेल्या सरकारसोबत राज्यांचा विकास वेगाने करण्याचे आहे. उपाध्यक्ष बी. जे. पांडा म्हणाले. पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते राजकारण हे सामाजिक आणि देशहिताची जबाबदारी या नात्याने करतात, असे नड्डा म्हणाले.

Web Title: bjp gears up for 5 state assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा