नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले भाजपा नेत्याचे घर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:51 AM2019-03-28T10:51:10+5:302019-03-28T10:51:35+5:30
बिहारमधील एका भाजपा नेत्याचे घर नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले आहे.
पाटणा - बिहारमधील एका भाजपा नेत्याचे घर नक्षलवाद्यांनी डायनामाइट लावून उडवले आहे. माजी आमदार आणि भाजपा नेते अनुज कुमार सिंह यांच्या घराला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दरम्यान नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार अनुज कुमार सिंह यांचे डुमरिया येथे घर आहे. येथे त्यांच्या काकांचे कुटुंबीय आणि एक कामगार राहतो. नक्षलवाद्यांनी या घराला लक्ष्य करताना बुधवारी रात्री 11 च्या सुमारास डायनामाइट लावून हे घर उडवून दिले. तसेच अनुज सिंह यांचे चुलत भाऊ जय सिंह यांना नक्षलवाद्यांनी मारहाण केली.
Gaya: Residence of former MLC & BJP leader Anuj Kumar Singh in Dumariya blasted with dynamite by Naxals last night. No casualties reported. The Naxals also left a poster demanding boycott of elections. Police investigation underway. #Biharpic.twitter.com/bcr8xNQczX
— ANI (@ANI) March 28, 2019
यासंदर्भात एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की घटनास्थळावर पोलीस तपास करत आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आळी आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
माजी आमदार असलेल्या अनुज सिंह यांना काही दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून धमक्या देण्यात येत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नक्षलवाद्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा स्फोट घडवून आणला. दरम्यान, 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी याच प्रकारे स्फोट घडवून जनार्दन राय यांचे घर उद् ध्वस्त केले होते.