ओवेसीदेखील हनुमान चालीसा वाचतील; भाजप नेत्याच वादग्रस्त ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 02:16 PM2020-02-04T14:16:56+5:302020-02-04T14:29:02+5:30
अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी हनुमान चालीसा वाचली होती.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून, त्यापूर्वी राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे मॉडेल टाउन विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हनुमान चालीसा वाचली असून, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सुद्धा हनुमान चालीसा वाचतील असे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी हनुमान चालीसा वाचली होती. याच मुद्यावरून बोलताना मिश्रा म्हणाले की, केजरीवाल हनुमान चालीसा वाचयला लागले असून, पुढे आता ओवेसी देखील हनुमाना चालीसा वाचतील.
केजरीवाल हनुमान चालीसा पढ़ने लगे है, अभी तो ओवैसी भी हनुमान चालीसा पढ़ेगा
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 4, 2020
ये हमारी एकता की ताकत हैं। ऐसे ही एक रहना हैं। इकट्ठा रहना हैं। एक होकर वोट करना हैं।
हम सबकी एकता से "20% वाली वोट बैंक" की गंदी राजनीति की कब्र खुदकर रहेगी
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, हिच आमच्या एकतेची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला एकत्र राहावे लागेल. तसेच निवडणुकीत सुद्धा सर्वांनी एक होऊन मतदान करायले पाहिजे. आपल्या सर्वांची एकता 20 टक्के मत बँक असलेल्या लोकांचं घाणरडे राजकरण संपवून टाकेल, असेही ते यावेळी म्हणाले.