नवी दिल्ली - अयोध्येत बुधवारी होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनापूर्वी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले, मझ्या मनातील स्वप्न पूर्ण होत आहे. उद्याचा दिवस सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे.
आडवाणी म्हणाले, कधी-कधी एखाद्याच्या जीवनात महत्वाचे स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ लागतो. मात्र, जेव्हा शेवटी त्याला समजते, तेव्हा प्रतीक्षा सार्थक होते. असेच एक स्वप्न, माझ्या हृदयाजवळ आहे, जे आता पूर्ण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करत आहेत. खरे तर हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठीच ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस आहे. एवढेच नाही, तर राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणे हे भारतीय जनता पक्षाचे मिशन राहिले आहे, असेही आडवाणी म्हणाले.
रथ यात्रेचीही आठवण -लालकृष्ण आडवाणी म्हणाले, राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान, 1990 मध्ये 'सोमनाथ से अयोध्या तक' राम रथ यात्रेच्या रूपात मी एक महत्वाचे कर्तव्य पार पाडले. ज्यामुळे अनेक लोकांच्या आकांक्षेला, उर्जेला आणि त्यांच्या उत्तक भावनेला बळकटी मिळाली, असे मला वाटते.
आडवाणी म्हणाले, राम जन्मभूमी आंदोलनात बहुमूल्य योगदान आणि बलिदान देणाऱ्या भारत आणि जगातील संत, नेते आणि लोकांप्रती मी आभार व्यक्त करू इच्छीतो. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राम मंदिराच्या उभारणीला शांततामय वातावरणात सुरू होत आहे. याचाही मला आनंद वाटतो. यामुळे, भारतीयांतील संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल, असेही आडवाणी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
UPSC परीक्षेत राहुल मोदीचा 420वा रँक, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा!
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...