...अन् रागाच्या भरात भाजपा आमदाराने पुजेची आसनव्यवस्था लाथेनं उडवली, घातला गोंधळ; Video जोरदार व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 07:42 AM2020-12-28T07:42:03+5:302020-12-28T07:45:54+5:30
BJP Ramesh Chandra Mishra : आमदाराने घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळयात भाजपाच्या एका आमदाराने जोरदार गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नाही तसेच भूमीपूजन फलकावर आमदाराचं नाव लिहिलं नसल्याने त्यांना संताप अनावर झाला आहे. रमेश चंद्र मिश्रा असं या आमदाराचं नाव असून त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रचंड गोंधळ घातला. फलकावर नाव नसल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. आमदाराने घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील बदलापूरमधील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहाय्याने शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी (डीएम) दिनेश कुमार सिंह हे स्मारकाच्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करणार होते. होम-हवन तसेच पुजेची सर्व तयारी कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. याच दरम्यान आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेलं नाही तसेच फलकावर आपलं नाव नाही हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
The honorable BJP MLA from Badlapur, Jaunpur (UP) Ramesh Mishra Ji learned that he wasn't invited to a foundation laying ceremony of a Gate in his area. His name was also missing from the stone to be put up.
— S Rajasekar (@srspdkt) December 27, 2020
What did he do next? Watch pic.twitter.com/kAGzifw8WV
शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वाराचा कार्यक्रम असल्याची माहिती मिळताच मिश्रा संतप्त झाले. स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाला का बोलावलं नाही? अशी त्यांनी विचारणा केली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या मंडळींना आणि अधिकाऱ्यांना याबाबत त्यांनी जाब विचारला. मतदारसंघात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीचं नाव भूमीपूजन फलकावर असलं पाहिजे असं रमेश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.
शेतकरी दांपत्याचा अनोखा आदर्श, सर्वत्र होतंय या निर्णयाचं कौतुक https://t.co/OuDDi6nz6L#farmer#Cow
— Lokmat (@MiLOKMAT) December 18, 2020
गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याबाबत आपण तक्रार करणार असल्याचं देखील मिश्रा यांनी म्हटलं आहे. संतापाच्या भरात पुजेसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती ती आमदारांनी लाथेने उडवली आहेत. तसेच खूप आरडाओरडा करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. या संपूर्ण गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून भाजपा आमदारावर टीका केली जात आहे. तसेच भाजपातील काही लोकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"भाजपाला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील"https://t.co/5pau791N5z#WestBengal#TMC#BJP
— Lokmat (@MiLOKMAT) December 20, 2020