भाजप आमदाराने चक्क शालेय विद्यार्थ्यांना केले पक्षाचे सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:21 AM2019-07-19T04:21:15+5:302019-07-19T04:21:26+5:30

भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने खाजगी शाळेत जाऊन चक्क विद्यार्थ्यांनाच पक्षाचे सदस्यत्व दिले.

BJP MLAs made the party students very good students | भाजप आमदाराने चक्क शालेय विद्यार्थ्यांना केले पक्षाचे सदस्य

भाजप आमदाराने चक्क शालेय विद्यार्थ्यांना केले पक्षाचे सदस्य

Next

चंदौली (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने खाजगी शाळेत जाऊन चक्क विद्यार्थ्यांनाच पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी त्याने विद्यार्थ्यांना भाजप अशी अक्षरे लिहिलेली उपरणेही घातली. याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे व सर्वत्र टीकेची झोडही उठत आहे.
चंदौलीच्या सैयदराजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुशील सिंह यांनी सुरू केलेल्या या आगळ्यावेगळ्या राजकारणाच्या शाळेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. आधी माफिया असलेले व नंतर राजकारणात उतरलेले ब्रिजेश सिंह यांचे सुशील सिंह हे पुतणे आहेत.
सध्या भाजपचे सदस्यता अभियान सुरू असून, याअंतर्गत या आमदाराने चक्क शालेय विद्यार्थ्यांनाच त्यांच्या वर्गात जाऊन सदस्य करून घेतले व पक्षामध्ये त्यांचे स्वागत केले. एवढेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गातच शपथही दिली. विद्यालयात शिकवणे सुरू असताना त्यांनी मध्येच हे अभियान राबवल्याचा आरोप होत आहे.
याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळाला असून, त्यांनी या प्रकारावर टीका केली आहे. याप्रकरणी जिल्हा शिक्षण निरीक्षक विनोदकुमार राय यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून खुलासाही मागवला आहे. दरम्यान, शाळेच्या वेळेत सदस्यत्व दिले गेले असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कारही केला आहे.
या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना भाजप आ. सुशील सिंह यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, त्या शाळेतील विद्यार्थी ग्रंथालयाची मागणी फार पूर्वीपासून करीत होते. (वृत्तसंस्था)
त्यासाठी मी शाळेत गेलो होतो. मात्र, शाळेच्या वेळेत कोणत्याही विद्यार्थ्याला सदस्यत्व दिले गेले असल्याचे खरे नाही.
दरम्यान, आ. सुशील सिंह यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपचे सदस्यत्व दिले व आपले टार्गेट पूर्ण केले. आणखी कोणी नेते कॉलेज व विद्यापीठांमध्ये जातील आणि त्यांना दिलेले टार्गेट लगेच गाठतील, अशी टीका पक्षातीलच एका कार्यकर्त्याने केली.
>ते तर बाहुबली...
आ. सुशील सिंह हे तर बाहुबली आहेत. त्यांचा शब्द कोण मोडणार? भाजपमध्ये प्रवेश दिलेले विद्यार्थी अल्पवयीन आहेत; पण याबाबत कुणालाच काही घेणे-देणे नाही, अशी टीका एका ज्येष्ठ शिक्षकाने केली.

Web Title: BJP MLAs made the party students very good students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा