भाजपाच्या महिला खासदार म्हणतात, मोहम्मद अली जिना हे महापुरुष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 09:50 AM2018-05-11T09:50:22+5:302018-05-11T09:55:40+5:30
वादग्रस्त वक्तव्ये करण्याची भाजपाच्या नेत्यांकडून सुरू असलेली मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या अलिगड मुस्लिम विद्यापीठामधील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील महिला खासदार...
बहराइच - वादग्रस्त वक्तव्ये करण्याची भाजपाच्या नेत्यांकडून सुरू असलेली मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या अलिगड मुस्लिम विद्यापीठामधील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील महिला खासदार सावित्रीबाई फुले यांनी जिना हे महापुरुष होते, असे सांगत नव्याने वाद ओढवून घेतला आहे.
#BharatiyaJanataParty (BJP) MP #SavitriBaiPhule has said that Pakistan's founder #MuhammadAliJinnah was a 'maha purush' who had contributed in country's independence.
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2018
Read @ANI Story | https://t.co/oyZvs8aM7Ypic.twitter.com/iJlDwOn2AD
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या पक्षीय भूमिकेशी फारकत घेऊन बोलणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी जिना प्रकरणीसुद्धा पक्षाच्या भूमिकेविरोधात आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या, जिना हे देशाचे महापुरुष होते आणि राहतील. अशा महापुरुषाचे छायाचित्र जिथे गरज असेल तिथे लावले पाहिजे. सध्या गरिबी, भुकबळी अशा मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून असले निरर्थक वाद उकरून काढले जात आहेत."
सावित्रीबाई फुले यांच्या आधी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी जिना यांना महापुरुष म्हटले होते. मात्रा योगी आदित्यनाथ यांनी जिना यांचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.