नुसरत जहाँ यांच्यावर प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा भाजपा खासदाराचा आरोप, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 01:07 PM2021-06-22T13:07:38+5:302021-06-22T13:08:38+5:30

Nusrat Jahan : भाजपा खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे.

bjp mp sanghamitra maurya writes lok sabha speaker seeks action against nusrat jahan over false information | नुसरत जहाँ यांच्यावर प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा भाजपा खासदाराचा आरोप, कारवाईची मागणी

नुसरत जहाँ यांच्यावर प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा भाजपा खासदाराचा आरोप, कारवाईची मागणी

Next

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. कारण, भाजपा खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे. तसेच, नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. (bjp mp sanghamitra maurya writes lok sabha speaker seeks action against nusrat jahan over false information)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी एक निवेदन जारी केले होते. यात भारतामध्ये दोन धर्मांमधल्या लग्नांना विशेष विवाह कायद्यानुसार मान्यता मिळणे गरजेचे असते, पण आपण असे न केल्याने निखिल यांच्यासोबतचे आपले लग्न कधीच वैध नव्हते. कायद्यानुसार ते लग्न नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. यानंतर नुसरत जहाँ यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.

लोकसभेच्या सभापतींना लिहिलेल्या पत्रात भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी म्हटले आहे की, "नुसरत जहाँ यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या माहितीवरून त्यांनी लोकसभा सचिवालयाला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन आपल्या मतदारांना हेतूपूर्वक फसवण्यासारखे आणि संसद व संसदेच्या सन्माननीय खासदारांची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे." याचबरोबर, पत्रात म्हटले आहे की, 'नुसरत जहाँ यांचे हे निवेदन प्रभावीपणे त्यांची लोकसभा सदस्यता गैर-कानूनी रूपात सादर करतेट. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणीही नुसरत जहाँ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नव्हती.

नुसरत जहाँ गर्भवती असल्याच्या बातम्या आल्यापासून चर्चा
नुसरत जहाँ गर्भवती असल्याच्या बातम्या आल्यापासून याबद्दल चर्चा होऊ लागली. नुसरत जहाँ  आणि व्यापारी निखिल जैन गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. तसेच, नुसरत जहाँ आणि भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले अभिनेते यश दासगुप्ता यांच्यात जवळीक असल्याची चर्चा व्हायला लागली. त्यानंतर आपले निखिलसोबत लग्न झाले नसल्याचा दावा नुसरत जहाँ यांनी केला होता. हे लग्न नव्हते तर लिव्ह - इन रिलेशनशिप होते, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. तसेच, आपण पूर्वीच विभक्त झाल्याचेही नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. दरम्यान, निखिल जैन यांच्यासोबत टर्कीमध्ये जून 2019 मध्ये नुसरत जहाँ यांनी लग्न केले. त्याच वर्षी लोकसभा निवडणूक जिंकत त्यांनी राजकीय कारकीर्दीलाही सुरुवात केली होती.

Web Title: bjp mp sanghamitra maurya writes lok sabha speaker seeks action against nusrat jahan over false information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.