कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप हळूहळू आणखी तीव्र होऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचा दावा जेपी नड्डा यांनी यावेळी केला. (bjp national president j p nadda criticized mamata banerjee in west bengal parivartan rally)
ममता दीदी राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही, तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले, असे सांगतममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा दावा जेपी नड्डा यांनी केला.
बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीका करायला हवी होती. मात्र, त्यांच्या वडिलांवर टीका करताना अभिषेक बॅनर्जी यांची भाषा बंगालच्या संस्कृतीला धरून नव्हती. ममता बॅनर्जी सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक असून, ती हळूहळू संपुष्टात आणण्याचे काम दीदींच्या कार्यकाळात झाले, असा दावाही जेपी नड्डा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात पश्चिम बंगाल आणि येथील जनतेबाबत विशेष आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या चुकीच्या वागणुकीमुळे आज अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. ममता बॅनर्जी सरकार केंद्राच्या योजनांची केवळ नावे बदलण्याच्या मागे आहे. बंगालच्या जनतेच्या मनात आता पंतप्रधान मोदींनी स्थान मिळवले आहे, असा विश्वास जेपी नड्डा यांनी व्यक्त केला.