नितीश कुमार यांना भाजपाकडून पाठिंब्याची ऑफर
By admin | Published: July 10, 2017 08:19 PM2017-07-10T20:19:51+5:302017-07-10T20:21:21+5:30
नितीश सरकारला संकट निर्माण झाल्यास पाठिंबा देण्याची खुली ऑफर भाजपाने दिली आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआयने सुरू केलेल्या कारवाईमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार अडणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला संकट निर्माण झाल्यास पाठिंबा देण्याची खुली ऑफर भाजपाने दिली आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी आज हे वक्तव्य केले. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नवे नाट्य सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, नितीश सरकारला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सीबीआयने निनावी मालमत्तेप्रकरणी सुरू केलेली लालू परिवाराविरुद्धची कारवाई आणि त्याचे राज्यातील महाआघाडी सरकारवरील परिणाम यावर चर्चा करण्यासाठी नितीश कुमार यांनी मंगळवारी संयुक्त जनता दलाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. मात्र त्याच बैठकीपूर्वीच भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा डाव टाकला आहे. भाजपाचे बिहार अध्यक्ष नित्यानंद राय नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर देताना म्हणाले,"नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कुठल्याही प्रकारचे संकट आले तर भाजपा त्यांना बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे." भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले तेजस्वी यादव यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. "तेजस्वी यादव जर राजीनामा देत नसतील तर त्यांना पदावरून हटवण्यात यावे. तेजस्वी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुठलाही कायदा निनावी मालमत्ता बाळगण्याची परवानगी देत नाही."
राय पुढे म्हणाले, "बिहारचा विकास होणे आवश्यक आहे. आता महाआघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय नितीश कुमार यांच्यावर आहे. जर नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली आणि राज्य सरकार अडचणीत आले तर आम्ही बाहेरून समर्थन देण्यास तयार आहोत. जर केंद्रीय नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही राज्य सरकारला कोसळू देणार नाही.
अधिक वाचा
(लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)
अधिक वाचा
(लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली होती. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली आहे. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे.