मध्य प्रदेशात जादूगार करणार भाजपचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:27 AM2018-10-22T04:27:32+5:302018-10-22T04:27:40+5:30
निवडणुका जिंकण्यासाठी कोणता पक्ष काय युक्ती करील ते सांगता येत नाही.
भोपाळ : निवडणुका जिंकण्यासाठी कोणता पक्ष काय युक्ती करील ते सांगता येत नाही. आता हेच पाहा ना मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांवर ‘जादू’करण्याचा प्रयोग भाजप करणार आहे. भाजपचे प्रवक्ते रजनीश अगरवाल यांनी सांगितले की, गत १५ वर्षांत पक्षाने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पक्ष जादूगारांची मदत घेणार आहे. तसेच, त्यापूर्वीच्या काँग्रेस सरकारशी तुलनाही करण्यात येणार आहे.
अगरवाल म्हणाले की, ग्रामीण आणि अर्धशहरी भागात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारात जादूगारांना उतरविण्यात येणार आहे. यासाठी किती जादूगार लागतील याची संख्या अद्याप ठरलेली नाही; पण भाजप लवकरच जादूचे हे कार्यक्रम सुरूकरणार आहे. गत १५ वर्षात पक्षाने उपेक्षित वर्गासाठी काय केले आहे हे या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. दिग्विजय सिंग यांच्या सरकारच्या दहा वर्षांच्या काळात १९९३ ते २००३ मध्ये रस्ते, वीज आणि पायाभूत सुविधांची कशी दुरवस्था होती, ते या माध्यमातून सांगण्यात येणार आहे.