“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:58 AM2021-06-11T10:58:26+5:302021-06-11T11:00:25+5:30
LAC: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे.
नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवर अद्यापही तणाव असल्याचे संकेत दिले जात आहेत. अलीकडेच प्रचंड थंडी आणि बदलत्या हवामानामुळे चीनचे सैन्य माघारी जात असल्याचे सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर भाजपच्याच एका खासदाराने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे. (bjp subramanian swamy says he realizes only india withdrew from lic after ladakh confrontation)
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर देशाची अंतर्गत संरक्षण आणि परकीय मुद्द्यांवरून सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यातच आता स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारला चीनच्या हालचालींपासून सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मला समजले की, लडाख येथे ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथून केवळ भारतीय सैन्य मागे हटले. मात्र, चीनचे सैन्य तेथेच असून ते पुढे आले, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
“अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा
चीन तर पुढे आणखी पुढे सरकतोय
सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करत एका युझरने ट्विटरवर म्हटले आहे की, संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीनमधील संघर्ष कमी व्हायला हवा. तसेच या युझरने एक रिपोर्ट शेअर केला असून, यामध्ये भारत आणि चीनमधील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर, सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली असून, खरच का? परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परत गेल्याचे जाहीर केले होते. आता मला समजतंय की, केवळ भारत माघारी आला असून, चीन आणखी पुढे सरकतोय, असे स्वामी म्हणाले.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
चीनविरोधात कठोर कारवाई करावी
सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. चीनकडून भारत आणि भूतान यांच्या भूभागावर कब्जा केला जात आहे. यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. घाबरून चीनला चोख प्रत्युत्तर देणे भविष्यात महागात पडू शकते, असा इशारा स्वामी यांनी दिला होता.
अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत संतापले
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांची पुरती वाट लागली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने चिनी सैनिकांचे पाय लडखडू लागले आहे. या थंडीने प्रकृती बिघडल्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मीने एलएसीवर तैनात ९० टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले होते. चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास ९० टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. त्यांनाही वातवरणाशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सांगितले जात आहे.