नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांची तयारी सुरू असून भाजपदेखील लोकांना मदत करणार आहे. यासाठी पक्ष दोन लाख प्रशिक्षित स्वास्थ्य स्वयंसेवकांची तुकडी तयार ठेवणार आहे. देशात अशा स्वयंसेवकांना प्रशिक्षणानंतर सक्रिय केले जाईल. राज्यांच्या स्तरावर त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर या स्वयंसेवकांना बूथ स्तरावर प्राथमिक उपचार किटसह तैनात केले जाईल. भाजपचे हे स्वयंसेवक गावागावांत जाऊन लोकांना मदत करतील.भाजप हा संदेश देऊ इच्छितो की, आम्ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो व त्याला मदतीसाठी तयार असतो. कोरोना काळात विरोधी पक्षांनी आरोप करून भाजपच्या अडचणी वाढवल्या म्हणून विरोधकांना तो संधी देऊ इच्छित नाही. स्वास्थ्य स्वयंसेवक कार्यक्रमाशी संबंधित भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, स्वास्थ्य स्वयंसेवकांना ऑक्सिमीटर, आवश्यक औषधे, हातमोजे, मास्क आणि पीपीई किट दिली जाईल.
यासाठी प्रत्येक मंडळ आणि प्रत्येक जिल्ह्यातून सदस्यांची निवड केली जाईल. निवडलेल्या पथकात एक डॉक्टर, एक महिला, एक आयटी सेलशी संबंधित लोक आणि एक सामान्य कार्यकर्ता असेल. त्यांना कोरोनाच्या संभाव्य धोक्यातून सुरक्षित कसे राहायचे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. zत्यांची जबाबदारी कोरोना संक्रमणाला थांबवणे, संक्रमित व्यक्तीला क्वारंटाइन करणे, त्याला प्राथमिक उपचार देणे आणि त्याच्यापर्यंत आरोग्य सेवा पाेहोचवण्याची असेल. याशिवाय स्वंयसेवक कोरोनाबाबत जनतेत जागरूकताही करतील, असे हा पदाधिकारी म्हणाला.कार्यकर्त्यांना प्रशिक्षणस्वयंसेवकांना पूर्ण देशात पाठवले जाईल; परंतु पक्षाचे खास लक्ष उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह ज्या पाच राज्यांत येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे तेथे असेल. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, समाजासाठी पक्ष संघटनेने हे पाऊल उचलले आहे.