"भाजपा काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस करेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 08:33 PM2019-05-17T20:33:31+5:302019-05-17T20:34:02+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वीच राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वीच राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. या विधानाचा आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ओवैसींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस भाजपा करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. ओवैसी म्हणतात, नरेंद्र मोदींनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचा बचाव आणि समर्थन केलं आहे. हे काही साध्वीचं व्यक्तिगत मत नाही. भाजपा पक्ष हा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या दहशतवाद्याबरोबर आहे. येत्या काही वर्षांत श्री श्री गोडसेचं नाव भारतरत्नासाठी देण्याची भाजपा शिफारस करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटवर व्हिडीओ पोस्ट करत ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलं आहे.
Remember, @narendramodi has defended & endorsed Pragya’s candidature
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 16, 2019
This is not a ‘lunatic fringe’ & is definitely not her “personal opinion”, it is the BJP standing by Independent India’s first terrorist. In few years, Sri Sri Godse will also be recommended with a Bharat Ratna https://t.co/2VVhc8xhQ3
कोलकात्यात सुरू असलेल्या वादाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्येही निष्पक्ष निवडणूक होण्याची मागणी केली जात आहे. फक्त पश्चिम बंगालमध्येच असं का होतंय. पूर्ण सात टप्प्यांमध्ये असं झालं पाहिजे, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
[1/3] @ECISVEEP since the recent discovery of your own powers under Article 324 of Constitution, would you use it to bar someone who has called elections a dharam yudh, insulted terror victims & martyrs? She's now glorified Free India's 1st terrorist.https://t.co/CqtfONPfxu
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 16, 2019
[2/3] @rajnathsingh you've promised that sedition law will be strengthened further if you come back to power (God forbid). Is insulting Gandhi & glorifying the his murderer sedition? Or is sedition law reserved only for minorities, Adivasis, Dalits & university students?
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 16, 2019
[3/3] @INCIndia maintaining law & order is still your responsibility in Madhya Pradesh. Since your government has no qualms in applying the National Security Act - would you consider applying it against Pragya? Or is that also reserved for Muslims, Dalits & Adivasis only?
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 16, 2019
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. साध्वी यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे.