लेह - सहाव्या लडाख पर्वतीय विकास परिषद लेह निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. एकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी या निवडणुकीवर अनेक पक्षांनी बहिष्कार घातला होता. मात्र नंतर एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नंतर निवडणुकीचा मार्ग मोकळाझाला होता.पर्वतीय परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांचा ईव्हीएमचा वापर झाला. तसेच २३ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने सर्वा २६ जागांवर उमेदवार उतरवले होते. तर आम आदमी पक्षाने १९ उमेदवार दिले होते. तसेच २३ अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते.
लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड
By बाळकृष्ण परब | Published: October 27, 2020 7:50 AM
BJP News : लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ठळक मुद्देएकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवला काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागलेया निवडणुकीत एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता