लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टर प्लॅन! इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं भाजपत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 03:49 PM2023-07-23T15:49:26+5:302023-07-23T15:50:10+5:30
"आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात."
देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीत व्यस्त दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसुद्धा वाढताना दिसत आहे. एका वृत्त वाहिणीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला इतर पक्षांचे नेते पक्षात सामील करून घेण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन आहे.
यासंदर्भात एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सपा आमदार दारा सिंह चौहान भाजपमध्ये सामील झाले आहेत. सुभासपा अध्यक्ष ओपी राजभरही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय, 24 जुलैला सपा आणि आरएलडीचे अनेक नेते भाजपत सामील होतील.
हे नेते होऊशकतात भाजपत सामील -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात. सपा नेते जगदीश सोनकर, सपा नेते सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपत सामील होऊ शकतात.