पुढील वर्षी देशाचे राजकारण ठरविणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक (Uttar Pradesh Election) होणार आहे. मात्र, आतापासूनच सत्ताधारी भाजपा (BJP) निवडणुकीच्या मोडमध्ये आली आहे. सामान्यांशी जोडता येईल असे सारे प्रयत्न भाजपाने सुरु केले आहेत. यामुळेच भाजपाने गरीब कल्याण संमेलनाची सुरुवात करण्याचे ठरविले आहे. यानुसार भाजपा आमदार आणि त्यांचे मंत्री आजवर केलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार आहेत. (BJP will Start campaign to win Uttar Pradesh Again. )
हे संमेलन 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे चालणार आहे. यामध्ये राज्य सरकारच्या सरकारी योजना घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. याचे आयोजन राज्यस्तरीय होणार आहे. यामध्ये भाजपा आमदारापासून मंत्रीदेखील भाग घेतील. तसेच बूथ लेव्हलवर सामान्य लोकांना भेटतील.
भाजपा प्रवक्ता मनीष शुक्ला यांनी सांगितले की, या प्रकारच्या यात्रांद्वारे आम्ही सामान्य लोकांमध्ये जाऊ इच्छित आहोत. याद्वारे आम्ही मागील वर्षापर्यंत केलेली कामे लोकांना सांगू शकतो.
सुत्रांनुसार उत्तर प्रदेश भाजपाचे जवळपास 2.5 कोटी सदस्य आहेत. हे सदस्य 4 कोटी बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जर हे सदस्य 4 कोटी झाले तर आरामात राज्यात 300 हून अधिक जागा जिंकता येतील. यामुळे भाजपा पुढील काळात आणखी 1.5 कोटी सदस्य बनविण्याचा प्रयत्न करेल. यासाठी भाजपा उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम करणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपा शेतकऱ्यांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी लागली आहे. यामुळे 18 सप्टेंबरला शेतकरी संमेलन आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी राधा मोहन सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आदी सहभागी होतील.