भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 03:27 PM2019-01-18T15:27:25+5:302019-01-18T15:35:23+5:30

यूपीए आणि एनडीए सरकारच्या योजनांची तुलना

Bjps Takes A Dig At Upa Highlights Achievements Of Nda through 5 year challenge | भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या #10 YearChallange ची जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनेक जण त्यांचा 10 वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो शेअर करत आहेत. 10 वर्षात आपल्यात नेमका काय बदल झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सरकारनं #5YearChallange सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

भाजपानं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पाच वर्षांपूर्वीच्या आणि सध्याच्या योजनांची तुलना केली आहे. यूपीए काळातील योजनांची स्थिती आणि त्याच योजनांची सद्यस्थिती यामधून दाखवण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले पायाभूत प्रकल्प मोदी सरकारनं पूर्ण केल्याचा दावा यातून करण्यात आला आहे. 

भाजपाचे आणि अनेक मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर हा मोहिमेचं समर्थन केलं आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली 2014 पासून देशात अनेक शानदार बदल केल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 




#5YearChallange च्या माध्यमातून वीज, गॅस जोडणी, स्वच्छता, बँक खाती, खतांची किंमत, रस्तेबांधणी, थेट परकीय गुंतवणूक, लष्कराशी संबंधित प्रकल्प यांच्या संदर्भातील आकडेवारी दाखवण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. 







गॅस जोडणीसंदर्भात भाजपानं ट्विटरवर कार्टूनच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 2013 मध्ये लोकांना एलपीजी सिलिंडर मिळणं अवघड होतं. मात्र आता सिलिंडरची डिलेव्हरी थेट घरापर्यंत होते. याच प्रकारे आणखी एका कार्टूनमधून 2013 मध्ये समोर आलेले यूपीए सरकारचे घोटाळे दाखवण्यात आले आहेत. काँग्रेसच्या काळात फक्त घोटाळे झाले. तर भाजपाच्या काळात देशाचा विकास झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. 







#5YearChallange मधून भाजपानं स्वस्त घरांच्या योजनेवरुनही यूपीए सरकारला लक्ष्य केलं. याशिवाय आधीच्या सरकारमधील आरोग्य योजना आणि भाजपाच्या आरोग्य सुविधांचीही तुलना करण्यात आली आहे.





#5YearChallange मध्ये देशातील सर्वात लांब पुलाचादेखील (बोगीबील) उल्लेख आहे. यालरही कार्टूनच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. 


Web Title: Bjps Takes A Dig At Upa Highlights Achievements Of Nda through 5 year challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.