नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या #10 YearChallange ची जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनेक जण त्यांचा 10 वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो शेअर करत आहेत. 10 वर्षात आपल्यात नेमका काय बदल झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सरकारनं #5YearChallange सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपानं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पाच वर्षांपूर्वीच्या आणि सध्याच्या योजनांची तुलना केली आहे. यूपीए काळातील योजनांची स्थिती आणि त्याच योजनांची सद्यस्थिती यामधून दाखवण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले पायाभूत प्रकल्प मोदी सरकारनं पूर्ण केल्याचा दावा यातून करण्यात आला आहे. भाजपाचे आणि अनेक मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर हा मोहिमेचं समर्थन केलं आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली 2014 पासून देशात अनेक शानदार बदल केल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 3:27 PM