बॉयफ्रेंड बोलत नव्हता म्हणून अल्पवयीन गर्लफ्रेंड 700 किमी दूर भेटायला आली अन् केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 05:10 PM2023-06-17T17:10:48+5:302023-06-17T17:11:23+5:30
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने 700 किमी दूरचा प्रवास केला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने 700 किमी दूरचा प्रवास केला आहे. मात्र बॉयफ्रेंडने तिला भेटण्यास नकार दिल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. ब्लेडने आपला हात कापून घेतला आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणं गाठलं आहे. पोलीस ठाण्यात येताच मुलगी बेशुद्ध पडली. मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर होती.
पोलिसांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण मंगळपूर पोलीस ठाण्यातील झिंझक शहराशी संबंधित आहे. झिंझक शहरातील एक तरुण मध्य प्रदेशातील इंदूर शहरात खासगी नोकरी करत असे. तेथे त्याची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री झाली. दोघांच्या या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. यानंतर तरुण घेऊन घरी आला. हा प्रकार तरुणाच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी मुलीशी बोलू नको असं सांगितलं. घरच्यांच्या सांगण्यावरून तरुणाने मुलीशी बोलणं बंद केलं.
बॉयफ्रेंड काही बोलत नसल्याने मुलीने थेट त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी प्रियकराच्या शोधात ती इंदूरपासून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूर या झिंझक गावात आली. मुलगी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली तेव्हा बॉयफ्रेंडने तिला भेटण्यास नकार दिला. यानंतर मुलीने ब्लेडने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हाताची नस कापल्यानंतर मुलीने पोलीस ठाणं गाठलं. मुलीच्या हातातून रक्त येत असल्याचे पाहून पोलीस चक्रावून गेले. दरम्यान ती बेशुद्ध पडली. मात्र, नंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे उपचार केल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. तरुण घाबरून काहीही न सांगता तेथून गायब झाला. आता पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.