'कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या तर 24 तासांच्या आत भाजपाचे सरकार'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:20 AM2019-03-13T11:20:34+5:302019-03-13T11:36:01+5:30
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास राज्यात भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला आहे.
कर्नाटकातीलभाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला आहे. यारागट्टी गावात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी येडियुरप्पा यांनी असं म्हटलं आहे.
येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनाची लाट आली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले होते.
BS Yeddyurappa, BJP: If the people of Karnataka give us 22 seats in the upcoming Lok Sabha elections, we will form the government in Karnataka within 24 hours. (10.03.2019) pic.twitter.com/xkWUAWaMAc
— ANI (@ANI) March 13, 2019
गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण 28 जागांपैकी भाजपा 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने 2 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्यावर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे सध्या भाजपाकडे 16 जागा आहे.