Budget 2018: हेल्थ सेक्टरसाठी मोठी घोषणा, 10 कोटी कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला मिळणार 5 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 01:12 PM2018-02-01T13:12:56+5:302018-02-01T13:18:48+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासंबंधी मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासंबंधी मोठी घोषणा केली आहे. सरकारने राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली आहे. त्याचा 10 कोटी गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत सरकारने आरोग्य सुरक्षा कवच प्रदान केले आहे.
या गरीब कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला 5 लाख रुपये मिळतील. प्रायोगिक तत्वावर ही योजना असून भविष्यात त्याचा विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे जेटलींनी सांगितले.
50 कोटी लोकांना त्याचा फायदा होईल. टीबीमुळेही ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुग्ण दगावतात. या टीबीला रोखण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देशात नवीन 24 वैद्यकीय कॉलेजेस आणि रुग्णालये उभारण्यात येतील. यापुढे तीन लोकसभा मतदारसंघांसाठी एक रुग्णालय बांधण्यात येईल अशी घोषणा जेटली यांनी केली.