Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:53 PM2019-02-01T14:53:49+5:302019-02-01T15:37:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जी अपेक्षा होती. ती या अंतरिम अर्थसंकल्पातून पूर्ण होणार आहे. देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. सरकारच्या तिजोरीवर 75 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे, तरीही शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतून शेकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय, बँकेचे कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतले नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असेही अमित शहा म्हणाले.
BJP Chief Amit Shah on #Budget2019 : The budget has met the expectations of farmers, labourers & middle class. By bearing a cost of Rs 75,000 crore,the govt will implement Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme. This scheme will also benefit those farmers who do not take loans. pic.twitter.com/Tk5l60UU4U
— ANI (@ANI) February 1, 2019
Budget 2019 Latest News & Live Updates
Budget 2019: लोकसभेत भाजपा खासदारांनी विरोधकांना विचारले, 'हाउ इज द जोश?'https://t.co/TYMsH7nNKt#BudgetSession2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
- असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार
- 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
- पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत
- किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी
- सरकार कामधेनू योजना सुरू करणार
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
- दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार
- गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
- यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
- आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
- एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं