Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 12:36 PM2019-02-01T12:36:59+5:302019-02-01T13:00:56+5:30
Budget 2019: करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली -पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये बसलेला फटका, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी-नोकरदार वर्गात असलेली नाराजी आणि तोंडावर आलेला लोकसभेचा महासंग्राम लक्षात घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. हे अंतरिम बजेट असलं तरी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसारच, करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशभरातील ३ कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली आहे.
Budget 2019 Latest News & Live Updates
5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही - पीयूष गोयल #Budget2019#BudgetSession2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार https://t.co/uS41BrsMnd
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार https://t.co/vBCoDhq1Mw#Budget2019#BudgetSession2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
Budget 2019 LIVE Updates: इन्कम टॅक्स स्लॅब कुठलाही बदल नाही, मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांची निराशा https://t.co/epHAcvZTFJ#demonetization #Budget2019#BudgetSession2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019