मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प हा नवीन येणाऱ्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अंमलात असतो. अंतरिम अर्थसंकल्पात फक्त जमाखर्चाचा तक्ता दिलेला असतो. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही सवलती जाहीर करता येत नाहीत. कारण, सरकारने अर्थसंकल्पाचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकू नये यासाठी तसा कायदा करण्यात आला आहे.दरम्यान, हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी अर्थमंत्रालयाकडून जास्त मेहनत घेतली जाते. संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाकडे देशातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच, अर्थमंत्री ज्या लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणतात. ती लाल रंगाची सुटकेसही खास आहे. कारण, गेल्या 159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे. 1860 साली ब्रिटनचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी लेदर बॅगेतून पहिल्यांदा आर्थिक लोखाजोखा आणला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ब्रिटनच्या राणीने स्वतःहून विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांना ही खास सूटकेस गिफ्ट दिली होती.त्यानंतर नकळत लाल सुटकेसचा पायंडाच पडला. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थ संकल्प मांडण्यात आला. त्यावेळी षण्मुखम चेट्टी यांनीही पहिल्यांदा लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता. त्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री लाल रंगाची नवीन सुटकेस वापरतात.
संसदेत आत्तापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केलाय अर्थसंकल्प १९४७-४९ आर. के. षन्मुखम चेट्टी१९४९-५० जॉन मथाई१९५०-५७ सी. डी. देशमुख१९५८-६३ मोरारजी देसाई१९६३-६५ टी. टी. कृष्णमचारी१९६५-६७ सचिंद्र चौधरी१९६७-६९ मोरारजी देसाई१९७१-७५ यशवंतराव चव्हाण१९७५-७७ चिदम्बरम सुब्रहमयम१९७७-७९ हरिभाई एम पटेल१९८०-८२ आर. वेंकटरमण१९८२-८४ प्रणब मुखर्जी१९८४-८७ व्ही पी सिंह१९८७-८८ एन डी तिवारी१९८७ राजीव गांधी१९८८-८९ शंकरराव चव्हाण१९८९-९० मधु दंडवते१९९०-९१ यशवंत सिंह१९९१-९६ मनमोहन सिंह१९९७-९८ पी चिदम्बरम१९९९-२००१ यशवंत सिन्हा२००३-०४ यशवंत सिन्हा२००५-०८ पी चिदंबरम२००९-१२ प्रणब मुखर्जी२०१२-१४ पी चिदम्बरम२०१४-१८ अरुण जेटली