अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारचे मोठे पाऊल; सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:43 PM2024-01-30T16:43:47+5:302024-01-30T16:44:13+5:30

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व निलंबित विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

Budget Session: Govt's Big Step Ahead of Session; Suspension of all suspended MPs withdrawn | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारचे मोठे पाऊल; सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारचे मोठे पाऊल; सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे

Budget 2024: उद्या(दि. 31 जानेवारी) पासून संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी, हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबन करण्यात आलेल्या सर्व विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.

प्रल्हाद जोशी म्हणाले, 'सर्व खासदारांचे निलंबन रद्द केले जाईल. मी लोकसभा आणि राज्यसभा सभापतींशी याबाबत चर्चा केली आहे. हे सभापतींच्या अधिकारक्षेत्रात आहे, त्यामुळे आम्ही संबंधित विशेषाधिकार समित्यांशी बोलून निलंबन रद्द करण्याबाबत विनंती केली आहे. यावर दोन्ही सभापतींचे एकमत झाले आहे. निलंबित खासदार उद्यापासून सभागृहात येऊ शकतात.

अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक 
लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील सभागृहाचे उपनेते राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व केले.

या बैठकीत काँग्रेस नेते कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेते टीआर बालू, शिवसेनेचे राहुल शेवाळे, समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन, जनता दल (युनायटेड) नेते एस.टी. रामनाथ ठाकूर आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) जयदेव गल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
 

Web Title: Budget Session: Govt's Big Step Ahead of Session; Suspension of all suspended MPs withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.