नवी दिल्ली : सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपाला कर्नाटकात राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यास बोलावताच, गोवा, बिहार व मणिपूर व मेघालय या चार राज्यांतील सर्वात मोठ्या पक्षांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला.गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि ४0 सदस्यांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक १६ आमदार असल्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी विनंती केली. तिथे भाजपाचे १३ आमदार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल सतपाल मलिक यांची भेट घेतली. तिथे राजदकडे ८0 आमदार तर सत्ताधारी जद (यू) कडे ७१ आमदार आहेत. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनीही कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. तिथे ६0 पैकी सर्वाधिक २८ आमदार काँग्रेसचे आहेत. भाजपाकडे २१ आमदार असूनही तेव्हाच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यास दिले.>मेघालयात भाजपाचे दोनच आमदारमेघालयात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी राज्यपालांची भेट मागितली आहे. तेथील विधानसभेच्या ५९ पैकी २१ जागांवर काँग्रेस विजयी झाली. मात्र, केवळ २ आमदार असलेल्या भाजपाने तिथे १९ आमदार असलेल्या पक्षाला हाताशी धरून सरकार बनविले. सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सरकार बनवायला बोलवा, अशी काँग्रेसची तिथे मागणी आहे.
आम्हाला सत्तास्थापनेसाठी बोलवा, गोव्यासह चार राज्यांत विरोधकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:36 AM