कॅनडाच्या पंतप्रधानांना अपमानास्पद वागणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:13 AM2018-02-20T03:13:45+5:302018-02-20T03:13:49+5:30

त्रिदेऊ यांनी सोमवारी पत्नी व तीन मुलांसह अहमदाबादमधील साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिराला भेट दिली. तेथेही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही आणि राज्याचा एकही ज्येष्ठ मंत्री त्यांच्या स्वागताला वा सोबत नव्हता

Canada PM's abusive behavior? | कॅनडाच्या पंतप्रधानांना अपमानास्पद वागणूक?

कॅनडाच्या पंतप्रधानांना अपमानास्पद वागणूक?

Next

त्रिदेऊ यांनी सोमवारी पत्नी व तीन मुलांसह अहमदाबादमधील साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिराला भेट दिली. तेथेही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही आणि राज्याचा एकही ज्येष्ठ मंत्री त्यांच्या स्वागताला वा सोबत नव्हता, असे सांगण्यात येते. त्रिदेऊ यांनी अहमदाबादमधील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

नवी दिल्ली : भारताच्या दौºयावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ यांना भारत सरकारकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्रिदेऊ आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर गेले नाहीत. त्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्याला तेथे पाठवले. ते ताजमहाल पाहायला गेले, तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांनी राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण ते अनुपस्थित राहिले.
कॅनडातील ‘टोरँटो सन’ वृत्तपत्रात कॅँडिस माल्कम या लेखिकेने लेख लिहून हे मुद्दे उपस्थित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू भारत दौºयावर आले होते तेव्हा मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.
पण या वेळी मात्र मोदी यांनी टाळले, असे त्यांनी लिहिले आहे.
मात्र, सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी त्रिदेऊ यांचा अवमान करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. त्रिदेऊ यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचाराचा जो सर्वमान्य संकेत आहे तो पाळण्यात आला होता. उलट दौºयाच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांना भेटण्याचे व चर्चा करण्याचे त्यांनी ठरविले याबद्दल भारताने आश्चर्य व्यक्त केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ २१ फेब्रुवारी रोजी सुवर्णमंदिरात जाणार आहेत. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्रिदेऊ यांची पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग अमृतसर येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतील असे सूत्रांनी सांगितले. त्रिदेऊ यांची भेट घेण्यास आपण उत्सुक आहोत असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची सोमवारी टिष्ट्वट करुन जाहीर केले होते. भारत दौºयाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात या दोघांची भेट ठरलेली नाही असे कॅनडाच्या अधिकाºयांनी म्हटले होते. पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली.

कॅनडाचे संरक्षणमंत्री व खलिस्तान समर्थक असलेले हरजितसिंग हे गेल्या वर्षी भारत दौºयावर आले असता त्यांची भेट घेण्यास अमरजितसिंग यांनी नकार दिला होता. ही घटना लक्षात ठेवून त्रिदेऊ अमरिंदरसिंग यांना भारत दौºयात भेटणार नाहीत असे म्हटले जात होते.

Web Title: Canada PM's abusive behavior?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.