Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 10:49 PM2021-08-21T22:49:27+5:302021-08-21T22:55:49+5:30
Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं.
"मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. कल्याण सिंह हे राजकारणी, अनुभवी प्रशासक आणि महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी त्यांचे सुपुत्र राजवीर सिंह यांच्याशीही संवाद साधला आणि शोक व्यक्त केला," असं ट्वीट पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
I am saddened beyond words. Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader and great human. He leaves behind an indelible contribution towards the development of Uttar Pradesh. Spoke to his son Shri Rajveer Singh and expressed condolences. Om Shanti. pic.twitter.com/ANOU2AJIpS
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2021
विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली - नितीन गडकरी
आदरणीय कल्याण सिंहजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. उत्तर प्रदेशात जनसंघ आणि भाजप उभा करण्यात कल्याण सिंहजी यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली. समर्पित राम भक्त, मातीशी नाळ असणारे खरे लोकनेते कल्याण सिंहजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
विचारधारा के प्रति दृढ़ कटिबद्धता के आगे सत्ता कितनी गौण है, यह सीख कल्याण सिंह जी ने हम सभी को दी। समर्पित राम भक्त , जमीन से जुड़े सच्चे जन-नेता कल्याण सिंह जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 21, 2021
अमित शाहंनीही वाहिली श्रद्धांजली
कल्याण सिंह यांच्या निधनामुळे देशानं एक खरा राष्ट्रभक्त, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे एक असे विराट वटवृक्ष होते, ज्यांच्या भाजपचं संघटन अधिक वाढलं. राष्ट्रवादाचे खरे उपासक म्हणून त्यांनी जीवनभर देशाची आणि जनतेची सेवा केली असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
कल्याण सिंह जी के निधन से देश ने आज एक सच्चे राष्ट्रभक्त, ईमानदार व धर्मनिष्ठ राजनेता को खो दिया। बाबूजी एक ऐसे विराट वटवृक्ष थे, जिनकी छाया में भाजपा का संगठन पनपा व उसका विस्तार हुआ। सांस्कृतिक राष्ट्रवाद के एक सच्चे उपासक के रूप में उन्होंने जीवनभर देश व जनता की सेवा की। pic.twitter.com/ZvL3gAj7Yl
— Amit Shah (@AmitShah) August 21, 2021
लोकसभा अध्यक्षांकडूनही श्रद्धांजली
कल्याण सिंह यांच्या निधनानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. "कल्याण सिंह यांच्या माध्यमातून आम्ही असं विराट व्यक्तीमत्व पाहिलं ज्यांनी आपल्या राजकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुऱ दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर एक छाप सोडली. इश्वर त्यांच्या आत्म्यास शआंती देवो," असं म्हणत बिर्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन
अलीगढमध्ये झाला होता जन्म
५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.
युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्री
कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते.