गाड्यांचे लाल दिवे गेले, पण व्हीआयपी कल्चर कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:16 AM2017-09-19T04:16:51+5:302017-09-19T04:16:53+5:30
केंद्र सरकारने मंत्री व अधिकारी यांच्या गाड्यांवरील लाल, पिवळे दिवे काढून व्हीआयपी संस्कृती संपवत असल्याचे भासविले खरे, पण पोलीस बंदोबस्तात देशभर व्हीआयपी संस्कृतीचे बटबटीत दर्शन घडतच आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंत्री व अधिकारी यांच्या गाड्यांवरील लाल, पिवळे दिवे काढून व्हीआयपी संस्कृती संपवत असल्याचे भासविले खरे, पण पोलीस बंदोबस्तात देशभर व्हीआयपी संस्कृतीचे बटबटीत दर्शन घडतच आहे. देशात सध्या २0 हजार ८२८ हजार व्हीआयपी असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी ५६ हजार ९४४ पोलीस राबत आहेत. याउलट ६३६ सामान्यांच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस आहे. लक्षद्वीपमध्ये मात्र, कोणालाही पोलीस संरक्षण दिलेले नाही. अनेक राजकीय, सामाजिक नेते, अधिकारी, कलावंत, क्रीडापटू यांना आपण पोलीस संरक्षणात फिरतो, याचेच भूषण वाटते. पोलीस संरक्षण हे त्यांना प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. केंद्र सरकारने लाल दिवा वापरण्यावर बंदी आणली, पण पोलीस दल राज्यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे कोणाला संरक्षण द्यायचे, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. 19.26 लाख पोलीस देशात आहेत, अहवाल पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटनं दिला आहे. तसेच 57000 पोलीस व्हीआयपींसाठी तैनात असल्याचंही ब्युरोच्या अहवालातून उघड झालं आहे.